Artbox

The CKP Food Fest

N/A Facebook Messenger Global Rank

सीकेपी फूड फेस्टिवल. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातीग्रुह विश्वस्त मंडळातर्फे साजरा केला जाणारा सीकेपी समाजाचा एक भव्य खाद्य महोत्सव. हजारो खवय्यांच्या पसंतीस उतरलेला आणि सीकेपी घरातील पाककौशल्याची चुणूक दाखवून अनेक ठाणेकरांच्या कौतुकास पात्र ठरलेला हा आगळा वेगळा खाद्य महोत्सव. मटण वडे , कोलंबीचे लिपते , बोंबलाचे भुजणे, भरले पापलेट, खिमा प्याटीस , तव्यावर तळलेली सुरमई, जीताड्याचे कालवण, चीम्बोरीचा काढा, चीम्बोरीचा रस्सा, कोलंबीची खिचडी, सोड्याची खिचडी, सुकट भाकरी इत्यादी मांसाहारी पदार्थांबरोबरच वालाचे बिरडे, शेवळाची कणी , वालाची खिचडी, मसुराची आमटी, खाजाचे कानोले, निनावं , अशा अनेक अस्सल सीकेपी पाककृतीची रेलचेल असणारा हा खाद्य सोहळा म्हणजे खवय्यांसाठी एक पर्वणीच असते. या बरोबरच सीकेपी कलाकाराच्या कलागुणांना संधी देण्यासाठी काही स्पर्धा, सीकेपी व्यावसायिक व उद्योजकांच्या उत्पादनांची विक्री व प्रदर्शन याचा देखील या महोत्सवात अंतर्भाव असतो. नक्की या !!! समीर गुप्ते आयोजक - सीकेपी फूड फेस्ट विश्वस्त - सीकेपी ज्ञातीग्रुह ट्रस्ट , ठाणे

Chat  on Messenger  on Messenger

Need a chatbot for your business?

Explore ManyChat chatbot templates for Messenger on the Botmakers marketplace

Vote for The CKP Food Fest